भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ

abhayachen sthal | ten hen ek achal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥१॥ तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ध्रु.॥ पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥२॥ तुका म्हणे कंठीं नाम । अंगीं भरलें सप्रेम ॥३॥