भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभय उत्तरी संतीं केलें दान । झालें समाधान चित्त तेणें

abhay uttari santin kelen dan | jhalen samadhan chitta tenen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अभय उत्तरी संतीं केलें दान । झालें समाधान चित्त तेणें ॥१॥ आतां प्रेमरसें न घडे खंडण । द्यावें कृपादान नारायणा ॥ध्रु.॥ आलें जें उचित देहविभागासी । तेणें पायांपासीं उभी असों ॥२॥ तुका म्हणे करी पूजन वैखरी । बोबडा उत्तरीं गातों गीत ॥३॥