भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभाव संगती नाना भूत व्यक्ती

abhav sangati nana bhut vyakti

अभाव संगती नाना भूत व्यक्ती । संसार पंगती मेळवी त्यासी ॥१॥ हरिनाम शोक करी अभाव कामारी । यातें दुरी करी हरिपाठें ॥२॥ संतांची संगती वेदश्रुतीची मती । घेउनियां हाती ब्रह्मशास्त्र ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नारायण नाणें । घेउनि पारखणें भक्तीपेठे ॥४॥