भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगियां न कळे वर्म । कोणा साधे शुद्ध कर्म । न घ्डे दान आणि धर्म । वाउगा श्रम जाणिवेचा

yogiyan na kale varma | kona sadhe shuddha karma | na ghde dan ani dharma | vauga shram janivecha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
योगियां न कळे वर्म । कोणा साधे शुद्ध कर्म । न घ्डे दान आणि धर्म । वाउगा श्रम जाणिवेचा ॥१॥ मुखें गाउं नाम वाचे । ब्रह्माज्ञान पुढें नाचे । भय नाहीं पापियां दुतांचे । आम्हांसी ते सर्वथा ॥२॥ ना करुं वाउग्या खटपटा । आगमनिगमांचा न घेऊ ताठा । वाउग्या त्या चेष्टा । नामविण न करुं ॥३॥ योगयाग न करुं तीर्थाटन । सुखें गाऊं जनार्दन । एका जनार्दनीं भजन । मुख्य मंत्र सोपरा ॥४॥