भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनियां नरदेहा । कांहीं स्वहित तें पहा

yeuniyan naradeha | kanhin svahit ten paha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येऊनियां नरदेहा । कांहीं स्वहित तें पहा ॥१॥ नाहीं तरी व्यर्थ जन्म । चिंतीतसे विषयकाम ॥२॥ पशु विषय सेविती । तयापरी तुझी स्थिति ॥३॥ निळा म्हणे व्यर्थ गेला । प्राणि भूमिभार झाला ॥४॥