भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनियां मातेपाशीं सांगे वृत्तांत । नामयाची होत आपदा घरीं

yeuniyan matepashin sange vruttant | namayachi hot apada gharin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येऊनियां मातेपाशीं सांगे वृत्तांत । नामयाची होत आपदा घरीं ॥१॥ आपुला परीस देऊं क्षणभरी । आपदातें दुरी करुं त्याची ॥२॥ एका जनार्दनीं करुनि विचार । परीस तो साचार घेऊनि आली ॥३॥