भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनियां कांता सांगे गोरियासी । सहकुटुंबेंसी विठा नाहीं

yeuniyan kanta sange goriyasi | sahakutumbensi vitha nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येऊनियां कांता सांगे गोरियासी । सहकुटुंबेंसी विठा नाहीं ॥१॥ मृत्तिका आणावयाची नाहीं जाहली वेळ । गेलासे समूळ न पडे दृष्टीं ॥२॥ ऐकतांचि ऐसी ज्ञानदेवें गोठी । गोरियासी कंठी धरियेलें ॥३॥ परदेशी नोहे पंढरीपणा । केलेंसे कारणा कार्य तुझें ॥४॥ आमुतें न भेटे जाहला असे गुप्त । एका जनार्दनीं मात प्रगटली ॥५॥