भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनी राउळा सांगे विठोबासी । वडील आम्हांसी गांजिताती

yeuni raula sange vithobasi | vadil amhansi ganjitati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येऊनी राउळा सांगे विठोबासी । वडील आम्हांसी गांजिताती ॥१॥ उदईक कापड घेऊनि बाजारासी जातों । परतोनि येतो सवेंचि घरा ॥२॥ व्यापार करावा तो कैसा मी नेणें । जन्मोनि पोसणें तुमचें देवा ॥३॥ आलें जें भोगांसी ते करणें लागे । एका जनार्दनीं सांगे गुज देवा ॥४॥