भजनी मालिका
← भजनांकडे परत

येउनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर । तयाचा संसार सुफळ झालागे माये

yeuni naradehasi vache uchchari dnyaneshvar | tayacha sansar suphal jhalage maye

रचनाकार: संत सेना · अभंग
येउनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर । तयाचा संसार सुफळ झालागे माये ॥१॥ प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी । तारिलें जगासी नाममात्रें ॥ २॥ जयाचें आंगणीं पिंपळ सोनियाचा । सिद्ध साधकाचा मेळा तेथें ॥३॥ तयाचे स्मरणें जळती पातकें| सांगत पंढरीनाथ सेना म्हणे ॥४॥