भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनी नामदेव बोले धोंडोबासी ऐवज आमुचा आम्हांसी द्यावा आतां

yeuni namadev bole dhondobasi aivaj amucha amhansi dyava atan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येऊनी नामदेव बोले धोंडोबासी ऐवज आमुचा आम्हांसी द्यावा आतां ॥१॥ तुमचा तो करार जाहलासे संपूर्ण । ऐवज आमुचा जाण आम्हां द्यावा ॥२॥ परि तो प्रत्यक्ष धोंडोबा दगड । अचेतन मूढ जीव नाहीं ॥३॥ धोंडोबा गणोबा एके ठायीं केले । कांहीं तुम्ही वहिलें बोलानाची ॥४॥ एका जनार्दनीं घेउनी धोंडोबासी । आपुले घरासी नामा आला ॥५॥