भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनि गर्भासी मेलों उपवासीं । नाहीं सखी ऐसी भेटली कोणी

yeuni garbhasi melon upavasin | nahin sakhi aisi bhetali koni

रचनाकार: संत सेना · अभंग
येऊनि गर्भासी मेलों उपवासीं । नाहीं सखी ऐसी भेटली कोणी ॥१॥ देह जाणे अनित्य करावें स्वहित । मोहापासुनि निश्चित सोडवील ॥२॥ न होय अनारिसा पाळी तोंडिच्या घासा। सोडवी ना ऐसी परी देखो॥३॥ वाटलो मीपणे धनमान कांहीं। सेना म्हणे नाहीं लाभ अलाभ ॥४॥