भजनी मालिका
← भजनांकडे परत

येतो जातो ना दिसेपरी । नित्य व्यभिचारी चित्ताचा

yeto jato na disepari | nitya vyabhichari chittacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येतो जातो ना दिसेपरी । नित्य व्यभिचारी चित्ताचा ॥१॥ ऐसाचि याचा चोरटा खेळ । आहे चक्रचाळ मुळींचाची ॥२॥ नेदी कळों न दावीच अंग । उमटोचि माग कैसा तो ॥३॥ निळा म्हणे सायास करितां । होतात वृथा आमुचे ते ॥४॥