भजनी मालिका
← भजनांकडे परत

येति जाति होति मरती । नानाकार भूतव्यक्ती

yeti jati hoti marati | nanakar bhutavyakti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येति जाति होति मरती । नानाकार भूतव्यक्ती ॥१॥ हा तो आहे जैसा तैसा । अनादि रुपें आपणाचि ऐसा ॥२॥ नहोनिया सूक्ष्मस्थूळ । वृध्द तरुणा अथवा बाळ ॥३॥ निळा म्हणे एकला येक । न होउनि एक ना अनेक ॥४॥