भजनी मालिका
← भजनांकडे परत

येथोनी आनंदु रे । कृपासागर तो गोविंदु रे

yethoni anandu re | krupasagar to govindu re

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येथोनी आनंदु रे । कृपासागर तो गोविंदु रे ॥१॥ महाराजाचें राउळी । वाजे ब्रह्मानंद टाळी ॥२॥ आनंदले भक्तजन । म्हणे धन्य रघुनंदन ॥३॥ लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेउनी बाहेर आली ॥४॥ एका जनार्दनीं नाम । पाहतां निवे आत्माराम ॥५॥