भजनी मालिका
← भजनांकडे परत

येतां देखोनियां बळिरामें । आकळिला तो अति विक्रमें । म्हणे पापिया तुवां अधर्म । बहुत केली कृष्णनिंदा

yetan dekhoniyan baliramen | akalila to ati vikramen | mhane papiya tuvan adharma | bahut keli krushnaninda

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येतां देखोनियां बळिरामें । आकळिला तो अति विक्रमें । म्हणे पापिया तुवां अधर्म । बहुत केली कृष्णनिंदा ॥१॥ तया दोषाचें प्रयश्रिचत । आजी घे पा यथोचित । होई देहापासूनि मुक्त । म्हणोनि टांगेसी धरियेला ॥२॥ तेणेंहि उदंड वेचिली शक्ती । परि तयापुढें न चालेचि युक्ती । मग बोभाइला अदृष्टाप्रति । म्हणे नाडलों रे अभिमानें ॥३॥ बळिया बलिष्ट शिरोमणी । बळिराम आणि चक्रपाणी । नेणतां महिमा वेंचिली वाणी । पावलों फळ तें साध्यांचि‍ ॥४॥ ऐसें बोलोनियां निश्रचळ । अवलोकिलें स्वरुप सकळ । झांकूनियां मग नेत्रकमळ । ध्यान हदय दृढाविलें ॥५॥ तंव बळरामें वेग केला । अंगाभोंवता ओवाळिला । आणि तेथेंचि पहा हो सोबकिला । प्रचंड खडकीं निघातें ॥६॥ निळा म्हणे दिधली मुक्ती । उत्तम कैवल्याही परती । कृपावंत हा श्रीपती । भक्तां वैरिया सारिखाचि ॥७॥