भजनी मालिका
← भजनांकडे परत

येरीकडे गोकुळाभीतरी । येतांचि परमात्मा श्रीहरी । विश्वकर्मा येऊनियां निमिशावरी । नगर शृंगारी कौतुके

yerikade gokulabhitari | yetanchi paramatma shrihari | vishvakarma yeuniyan nimishavari | nagar shrungari kautuke

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येरीकडे गोकुळाभीतरी । येतांचि परमात्मा श्रीहरी । विश्वकर्मा येऊनियां निमिशावरी । नगर शृंगारी कौतुके ॥१॥ निजेलीचे असतां नारीकुमरें । शृंगारिलीं वस्त्रे अळंकारें । वृध्द होताती ते निमासुरे । रुंपे मंडित योजिलीं ॥२॥ धन कनक घरोघरी । नाना धान्याचिया परी । सुख सोहळा वर्ते शरीरीं । पलंग सुपत्या न्याहालीया ॥३॥ नाना फळफळावळी । सुमने वरुषती वृक्षातळी । एकैक सुखाची नव्हाळी । वर्ते गोकुळी निजानंर्दे ॥४॥ कामधेनु ऐशीं गुरें । नंदिनीचिये परीचे वासुरे । प्राप्त:काळी देखती नारीनरें । परम विस्मयें दाटली ॥५॥ लक्ष्मी न समाय गोकुळांत । लेणीं लुगडीं अंळकारमंडित । धन संपत्ती नाही गणित । जेथे श्रीकांत वस्ती आला ॥६॥ निळा म्हणे सुखाची मरणी । गाई गोवळा आली गौळणी । सारस्वतें घोकिली तैशी वाणी । मधुर शब्दें अनुवादती ॥७॥