भजनी मालिका
← भजनांकडे परत

येरें शब्द ते ऐकोन । उभा ठाकला जगज्जीवन । माता म्हणे हे अवगुण । कांरे ऐसे करितोसी

yeren shabda te aikon | ubha thakala jagajjivan | mata mhane he avagun | kanre aise karitosi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येरें शब्द ते ऐकोन । उभा ठाकला जगज्जीवन । माता म्हणे हे अवगुण । कांरे ऐसे करितोसी ॥१॥ ठायीं वाडिलिया न जेविसी । आणि येथें माती खाशी । येरु म्हणे नाहीं ऐशी । प्रतिज्ञा मी दावीन ॥२॥ तंव ते म्हणे दावीं मुख । येरु म्हणे तरी हें देख । पाहे तंव माजीं त्रैलोकय । चंद्रसूर्य तारांगणें ॥३॥ मेरुकुळाचाळ पर्वत । नदादि नदीयांचे ओघ वहात । सप्तहि सागर भरतें येत । ऐसें देखत वदनामाजीं ॥४॥ भोवंडी आली पहातां नयनां । मग म्हणे निमटी निमटी आतां वदना । माव तुझी जगज्जीवना । नकळेचि आम्हां प्राकृतां ॥५॥ मग धरुनियां तो करतळीं आलिंगिला हदयमेळीं । विस्मयें दाटोनियां वेल्हाळी । आली घेउनी मंदिरां ॥६॥ निळा म्हणे सांगे लोकां । अपूर्व देखिलें म्यां कौतुका । मृत्तिकामिसें माजी त्रैलोक्या । पाहिलें वदनीं हरिचिया ॥७॥