भजनी मालिका
← भजनांकडे परत

येरे दिवशीं घेउनी सवें । गोवळ खिल्लारांचे थवे यमुनातटाकीं नित्य नवे । खेळ खेळती विचित्र

yere divashin gheuni saven | goval khillaranche thave yamunatatakin nitya nave | khel khelati vichitra

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येरे दिवशीं घेउनी सवें । गोवळ खिल्लारांचे थवे यमुनातटाकीं नित्य नवे । खेळ खेळती विचित्र ॥१॥ म्हणे यारे चेंडूफळी । खेळों अवघे मिळोनी बळी । ऐसें बालोनियां वनमाळीं । कास घालित नेटकी ॥२॥ चें डू घेऊनियां श्रीहरी । हाणे डाव मागें वरी । कानपिळा मग ते सारी । पाठीवरी बैसोनी ॥३॥ न सोडिचि पायातळीं येतां । मग तो हो कां कोणीहि भलता । म्हणे विचारुनियां तत्वत्तां । खेळा खेळ अवघेही ॥४॥ चिंतूनियां बरव्यापरी । चेंडू टाकिला कंळबावरी । अडकलासा देखोनी हरी । अभ्यंतरीं संतोषला ॥५॥ होतें आघींचि आर्त मनीं । काळया आणावा नाथुनी । मग म्हणे म्हणती गडे । डोहो तळीं वृक्षही अवघड । न धरीं कृष्णा याची चाड । करुं दुसरा नवा घरीं ॥७॥