भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणेंचि साधनें । तुटती संसारबंधनें

yenenchi sadhanen | tutati sansarabandhanen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येणेंचि साधनें । तुटती संसारबंधनें ॥१॥ म्हणोनियां करा लाहों । स्मरा रुक्मादेवी नाहो ॥२॥ येईल धांवतां । धावोनियां पाचारितां ॥३॥ निळा म्हणे हरी । कृपावंत दीनावरी ॥४॥