भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणेंचि आश्रमें साधती साधनें । तुटती बंधनें यमपाश

yenenchi ashramen sadhati sadhanen | tutati bandhanen yamapash

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येणेंचि आश्रमें साधती साधनें । तुटती बंधनें यमपाश ॥१॥ काया क्लेश न करणें व्रत तप दान । न लगे हवन तीर्थाटन ॥२॥ संतांचा सांगत गावें रामनाम । सुखें सुख विश्राम लाभे तुजसी ॥३॥ प्रपंच परमार्थ ऐक्य रुपें दोन्हीं । तोचि ब्रह्माज्ञानीं मनीं समजा ॥४॥ व्यापक तो जगीं व्यापुनीं निराळा । एका जनार्दनीं वेगळा सुखदुःखां ॥५॥