भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणें एकलें वो जाणेंही शेवटीं येथें राहणेचि नाहीं कल्पकोटी । जोडिलें धन तें न चले लक्ष कोटी । म्हणेनि आलिये या सांवळियाचे भेटी वो

yenen ekalen vo janenhi shevatin yethen rahanechi nahin kalpakoti | jodilen dhan ten na chale laksha koti | mhaneni aliye ya sanvaliyache bheti vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येणें एकलें वो जाणेंही शेवटीं येथें राहणेचि नाहीं कल्पकोटी । जोडिलें धन तें न चले लक्ष कोटी । म्हणेनि आलिये या सांवळियाचे भेटी वो ॥१॥ आतां घाला वो याच्या पायांवरी । हाचि चुकवील जन्माचि भोंवरी । शिणलें बहुत वो चौंयांयशींचे फेरीं । तोडिल चिंता हा हेचि आशा थोरी वो ॥२॥ बहुत गांजियलें मायामोहभ्रमें । रततां विषयीं या विषयाच्या कामें । करितां भरोवरी रित्या मनोधर्मे । याशी कृपा येतां हरील हा कर्मे वो ॥३॥ काम क्रोधीं वो जाचिलें बहुत । नेदी राहो वो क्षण एक निवांत । वरी पडती वो गर्वाचे आघत । म्हणोनि विनवणी सांगा त्वरित वो ॥४॥ आशा कल्पना या मातल्या पापिणी । मनशा चिंता डंखिती सर्पिणी । येती लहरी वो जाणिवेचि जाचाणी । म्हणोनि विनवितें हेंचि क्षणक्षणीं वो ॥५॥ आहे शेवटींचें माझें येथें पेणें । वाटे निश्चय हा याचिया दर्शनें । राहिलें चित्तीं वो याचेंचि चिंतन । निळा म्हणे आजि ऐकिलें गाहाणें वो ॥६॥