भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणें छंदे छंद लागली नव्हाळी । हा कान्हो वनमाळी वेध याचा

yenen chhande chhand lagali navhali | ha kanho vanamali vedh yacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येणें छंदे छंद लागली नव्हाळी । हा कान्हो वनमाळी वेध याचा ॥१॥ सरितां सरेना बैसला हृदयीं । तो आतां ठाईचें ठायीं जडलासे ॥२॥ एका जनार्दनी नोहेची परता । संपूर्ण पुरता भरला देहीं ॥३॥