भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणे आपुलिया कुपेची गुणें । माझीं पोशिली वो सर्वागजीवनें । देऊनि क्षेम अवघीं निवविली करणें । यासी काय देऊनि व्हावें म्या उत्तीर्ण वो

yene apuliya kupechi gunen | majhin poshili vo sarvagajivanen | deuni kshem avaghin nivavili karanen | yasi kay deuni vhaven mya uttirna vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येणे आपुलिया कुपेची गुणें । माझीं पोशिली वो सर्वागजीवनें । देऊनि क्षेम अवघीं निवविली करणें । यासी काय देऊनि व्हावें म्या उत्तीर्ण वो ॥१॥ माझें जीवींचा हा जिवलग सोयरा । यासी करुनि काय पूजावें उपचारा । जें जें कीजे तो तो उपाधी पसारा । कैसेनि पावेल या निज निविकारा वो ॥२॥ करुनि पूजूं जंव मंत्र तंत्र जप । जंव हा शब्दातीत निर्गुण अरुप । कोण करु यासी न पवेचि वो तप । ध्यानीं ध्याता हा अरुपीं अरुप वो ॥३॥ यासि न पुरे वो जाणिवे जाणतां । यासी न चले वो शहाणीव करितां । नाना तर्कवाद यापुढें वृथा । आतां कोणा करुं उपचार तत्वतां वो ॥४॥ करितां योगाभ्यास न पवे ती सिध्दी । करितां नाना याग वाढती उपाधी । नित्यनित्यज्ञानें अभिमानाची वृध्दी । आतां कोण्या युक्ति तोषवूं कृपानिधी वो ॥५॥ ऐसें जें करुं म्हणे आपुलिये मतीं । तें तें सांडीं परतें न धरी हा हातीं येकचि आवडे या शुध्द भाव भक्ती ।‍ निळा म्हणे वर्म दाविलें हें संती वो ॥६॥