भजनी मालिका
← भजनांकडे परत

येकायेक पण । नसंपडे दुजेंनविण

yekayek pan | nasampade dujennavin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येकायेक पण । नसंपडे दुजेंनविण ॥१॥ म्हणोनियां भक्त केला । आधीं मग देव जाहला ॥२॥ फुला आधीं फळ । नव्हेचि मुळेंविण डाळ ॥३॥ निळा म्हणे लेंक । होतां बापपणा बिक ॥४॥