भजनी मालिका
← भजनांकडे परत

येकलें न कंठेचि म्हणोनियां येणें । केलीं निर्माणें वो चौदाही भुवनें । गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणें । पांचही महाभूतें भौतिकें भिन्नें भिन्नें वों

yekalen na kanthechi mhanoniyan yenen | kelin nirmanen vo chaudahi bhuvanen | gagan chandra surya megh taranganen | panchahi mahabhuten bhautiken bhinnen bhinnen von

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येकलें न कंठेचि म्हणोनियां येणें । केलीं निर्माणें वो चौदाही भुवनें । गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणें । पांचही महाभूतें भौतिकें भिन्नें भिन्नें वों ॥१॥ ऐसा लाघविया मायासूत्रधारी । येकला येकटाचि झाला नानाकरी । स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरीं । तो हा नंदनंदन सये बाळब्रम्हचारी वो ॥२॥ याचिये नाभिकमळीं जन्म चतुरानाना । याचिया निजप्रभा प्रकाश रविकिरणा । याचिया महातेज हुताशना । येणेंचि पढवून वेद केला शहाणा वो ॥३॥ याचिया द्रावपणें समुद्रासी जळ । याचियां चपळपणें पवन हा चंचळ । याचिया अवकाशें आकाश पघळ । याचिया घृतिवळे अवनी हि अढळ वो ॥४॥ येणोंचि मेरुस्तंभ अचळ धरियेला । दिशादिग्पाळांसी येणेंचि ठाव दिधला । विधिविधानाचा शास्त्रा बोध केला । येणेंचि सुरपति स्वर्गी बैसविला वो ॥५॥ भोगूनि अंगना हा बाळब्रम्हचारी । येकला जेथें तेथें सोळा सहस्त्रा घरीं । आम्हां तुम्हां भोगूनि अलिप्त मुरारी । निळा म्हणे ऐसा विवादति नारी वो ॥६॥