भजनी मालिका
← भजनांकडे परत

यावरी म्हणे सवंगडियांसी । वत्सें फांकलीरे चौपासी । वळूनि आणा धांबा त्यासी । मग सावकाशी बैसा सुखें

yavari mhane savangadiyansi | vatsen phankalire chaupasi | valuni ana dhamba tyasi | mag savakashi baisa sukhen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यावरी म्हणे सवंगडियांसी । वत्सें फांकलीरे चौपासी । वळूनि आणा धांबा त्यासी । मग सावकाशी बैसा सुखें ॥१॥ तंव ते म्हणती हो वनमाळी । आजीचि वळती तुमची पाळी । जाऊनियां तूंचि सांभाळीं । आम्ही निष्काम आजिचेनि ॥२॥ तुंझिया शेषाची हे नवलाई । देहभाव आम्हां नुरेचि देहिं । जाणें येणें कैंचे काई । राहिलों ठायी निश्रचळपणें ॥३॥ देव म्हणे हे पावले खुणे । गडी माझो झाले शहाणे । समाधी सर्वहि । काय चतुराननें कीजे यांचे ॥४॥ यांचिये संगतीं वत्सें धालीं । ब्रम्हसुखातें पावलीं । वियोगवार्ता नेणती भुली । निजस्थिति राहिली स्वरुपींची ॥५॥ ऐसें जाणोनियां श्रीपती । म्हणे मी जातों आजिचे वळती । तुम्ही निश्रचळ रहा वृत्ती । कोणी सांगाती फांकों नका ॥६॥ निळा म्हणे सांगोनि ऐसें । मोहरी पावा घेतला हर्षे । वादन करितांचि पूर्व दिशे । वत्सेंहि सांडूनि चालिला ॥७॥