भजनी मालिका
← भजनांकडे परत

यावरी कोणे ऐके दिवशी । कृष्णें घेउनी सौंगडियांशी । आला यमुनेचे प्रदेशीं । तंव गाई खिल्लारें देखिलीं

yavari kone aike divashi | krushnen gheuni saungadiyanshi | ala yamuneche pradeshin | tanv gai khillaren dekhilin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यावरी कोणे ऐके दिवशी । कृष्णें घेउनी सौंगडियांशी । आला यमुनेचे प्रदेशीं । तंव गाई खिल्लारें देखिलीं ॥१॥ तयामाजी अंति चोखडें । वत्स गाईचे ते पाडे । त्याचि ऐसें धरुनी रुपडें । वत्सासुर तेथ उभा ॥२॥ कृष्ण म्हणेरे हो गडिही ऐका । एक एक वत्स धरा नेटका । माही धरितों म्हणवेनि तंव कां । थांबला वत्सासुरावरी ॥३॥ तंव तो मायावी असुर । शिंगे पसरुनि पातला समोर । मागें करित लताप्रहार । आडवाचि उडे हाणवया ॥४॥ गौळी करीताती हाहाकार । मारिला नंदकुमर । अचपळ हा नव्हेचि स्थिर । कासया वत्स धरुं गेला ॥५॥ याचिये वदनीं निघती ज्वाळ । नासापुटींहुनी धूम्रकल्लोळ । बरें नव्हे हा पातला काळ । प्राण घ्यावया प्रगटला ॥६॥ निळा म्हणे धरिला कर्णी । मुरगाळूनि पाडिला धरणीं । मुष्टीघातेंचि चक्रपाणी । मोक्षपदातें पाठवी त्या ॥७॥