भजनी मालिका
← भजनांकडे परत

यावरी गडियांसीं खेळत । आला यमुनेतीरा आंत । क्रीडा करितां करितां आर्त । देखिलें ऐसें यमुनेचें

yavari gadiyansin khelat | ala yamunetira ant | krida karitan karitan arta | dekhilen aisen yamunechen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यावरी गडियांसीं खेळत । आला यमुनेतीरा आंत । क्रीडा करितां करितां आर्त । देखिलें ऐसें यमुनेचें ॥१॥ जैशा येऊनियां गौळणी । कृष्णमुखीं घालिती लोणी । मीच अंतरलें गे पापिणी । होऊनियां पाणी वाहातुसे ॥२॥ कृष्ण म्हणे तुझिाया पोटीं । आहेती नवनिताचिया खोटी । काढूनी गाळ तो जगजेठी । सुखें भक्षितु बैसला ॥३॥ हें देखोनियां ते गडे । म्हणती बैसोनि एकीकडे । माती खातो हा निवाडें । सांगों धाविले यशोदे ॥४॥ म्हणती मृतिका आणूनि हरि । बैसला भक्षीत आवडीं करीं । ऐसें ऐकोनियां सुदरी । धांवली क्रोधें आवेशें ॥५॥ हातीं घेऊनिया सिपुटी । आली जवळीके नेहटीं । येरें देखोनियां ते दिठीं । मृत्तिका लपवुनी पळतसे ॥६॥ निळा म्हणे हाकारिते । माया धांवे आटोपित । नाटोपेचि मग ते म्हणत । घरां आलिया ताडीन ॥७॥