भजनी मालिका
← भजनांकडे परत

यावरी बगासुराची कथा । विचित्र आहे ते ऐकतां । कृष्णकरें पावोनि घाता । महामुक्तीतें वरील

yavari bagasurachi katha | vichitra ahe te aikatan | krushnakaren pavoni ghata | mahamuktiten varil

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यावरी बगासुराची कथा । विचित्र आहे ते ऐकतां । कृष्णकरें पावोनि घाता । महामुक्तीतें वरील ॥१॥ मग तो बगरुपीया असुर । ध्यानस्थ यमुनातीरी स्थीर । झांकूनियां उभय नेत्र । एकाचि पायावरी उभा ॥२॥ कृष्ण घातावरी चित्त मनीं चिुंतूनिया तिष्ठत । म्हणे केव्हां देखेन तो येथ । येतां खेळत जवळी कैं ॥३॥ बाळलीलें येतांचि जवळी । गटकाळीन जेवीं मांसळी । हे जाणोनियां वनामाळी । आला खेळींमेळीं गडियांसवें ॥४॥ तंव तो पक्षिया देखिला कैसा । राजहेस कां सरोवरीचा जैसा । शोभयमान निश्रचळ ऐसा । लेंकरें म्हणती चला धरुं ॥५॥ कृष्ण म्हणे रे पक्षी क्रूर । नका जाऊं त्या समोर । मत्स्याही महा निष्ठूर । पापकर्मा दुरात्मा ॥६॥ तुम्ही राहा एकीकडे । मागेंचि लपोनियां गडे । जाऊनि मी पाहतों पुढें । उघडितो नेत्र कीं नाही ॥७॥ पहा लपत लपतचि जातों । आणी देईल धरुं तरी आणितों । परी तुम्ही करा जें सांगतों । दुरीचि असा पैलाडी ॥८॥ तंव पालवथाचे अवघक लोक । पाहाती कृष्णाचें कौतुक । म्हणत नंदाचा हा बाळक । पहारे कैसा पिलंगतो ॥९॥ निळा म्हणे जैसा चित्ता हरणी देखोनियां तत्वता । सुरके भूमिची आतौता । तैसाचि हाही वेग करी ॥१०॥