भजनी मालिका
← भजनांकडे परत

यावरी आपण वृक्षातळीं । जाऊनियां वरी न्याहाळि । तंव ते म्हणती अरे वनमाळी । आतुर बुध्दि करुं नको

yavari apan vrukshatalin | jauniyan vari nyahali | tanv te mhanati are vanamali | atur budhdi karun nako

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यावरी आपण वृक्षातळीं । जाऊनियां वरी न्याहाळि । तंव ते म्हणती अरे वनमाळी । आतुर बुध्दि करुं नको ॥१॥ येथे हा आघाताचा ठावो । नेणसि तूं त्याचा भावो । अणुमात्र निसरतां पावो । होईल निर्वाहो जिवित्वाचा ॥२॥ आपुला घात दुर्जना हरीख । हें तों न करीतीं मूर्ख देख । तुज पुढें तों शाहणे आणिक । नाढळेंचि ये भुवनत्रयीं ॥३॥ नायकोनियां आमुच्या उत्तरा । व्यर्थचि वेचावें आत्मशरीरा । दु:खी करुनि मातापितरां । समागमिया देशवटा ॥४॥ ऐसा विचार होईल हरी । नको चढो या वृक्षावरी । ठेवितों तुझया पायांवरी । आम्ही सकळहि मस्तक ॥५॥ परीं तें नायकोनियां कृष्ण । चढला वरी बैस जाऊन । तया म्हणती अवघे जण । करीं हो सावधानपणें कार्य ॥६॥ तयांप्रति बहु बरें म्हणे । जाणता त्रैलोक्याचे खुणे । निळा म्हणे चरित्र करणें । आहे दाखवणें तेंचि करी ॥७॥