भजनी मालिका
← भजनांकडे परत

यासी पाहतां वो हदयस्थ पाहीला । यासि बोलतां वो वेदुचि घोकिला । यासि खेळतां कुसंगदोष गेला । यासि भोगितां हा प्रत्यवायी गळाला वो

yasi pahatan vo hadayastha pahila | yasi bolatan vo veduchi ghokila | yasi khelatan kusangadosh gela | yasi bhogitan ha pratyavayi galala vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यासी पाहतां वो हदयस्थ पाहीला । यासि बोलतां वो वेदुचि घोकिला । यासि खेळतां कुसंगदोष गेला । यासि भोगितां हा प्रत्यवायी गळाला वो ॥१॥ ऐसा निजानंद परमात्मा श्रीहरी । आम्हीं लाधलों वो भाग्याच्या संसारी । नित्य आलिंगूं या हदयाच्या अंतरीं । ऐशा निजबोधें निवाल्या सुंदरी वो ॥२॥ यासी विचारतां परमार्थ हातिं लागे । यासि विवरितां ये सिध्दांत वोळंगे । यासि विनटतां समाधि पायां लागे । यासी विनवितां हाचि वरिआं गे वो ॥३॥ यासि करुं जातां सहजचि गोठी । स्वार्थ परमार्थ पुरुषार्थ लागे पाठीं । यासी जिवीं ध्यातां यासिचि पडे मिठी । या गीतीं गातां बहमांड पडे पोटीं वो ॥४॥ यासीं करोनि पुढें विचरों जनीं वनीं । यासी घेऊनि संगे बैसों वो भोजनीं । यासि निजवूनि निजो निजशयनीं । याचें संग सुख घेऊं अनुदिनीं वो ॥५॥ निळा म्हणे निजाश्रमीची सकळा । ऐशा आरजा गौळणी त्या बाळा । ध्यानीं मनीं जिवीं ध्यातां या गोपाळा । गेल्या विसरोनियां संसार सोहळा वो ॥६॥