भजनी मालिका
← भजनांकडे परत

यमुने तटीं मांडिला खेळ । मेळवोनी गोपाळ सवंगडे

yamune tatin mandila khel | melavoni gopal savangade

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
यमुने तटीं मांडिला खेळ । मेळवोनी गोपाळ सवंगडे ॥१॥ जाहले गडी दोहींकडे । येकीकडे रामकृष्ण ॥२॥ खेळती विटीदांडु चेंडु । भोवरें लगोर्‍या उदंडु ॥३॥ ऐसा खेळ खेळे कान्हा । एका जनार्दनीं जाणे खुणा ॥४॥