भजनी मालिका
← भजनांकडे परत

यज्ञोपवित सांडिलें दुरी । शिखासूत्राची बोहरी । करुनियां मोहरी करीं । कांठी कांवळा गांजिवा

yadnyopavit sandilen duri | shikhasutrachi bohari | karuniyan mohari karin | kanthi kanvala ganjiva

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यज्ञोपवित सांडिलें दुरी । शिखासूत्राची बोहरी । करुनियां मोहरी करीं । कांठी कांवळा गांजिवा ॥१॥ उफराटी पडदणीं खेविली टिरी । सूक्ष्म शेंडी बोडक्यावरी । दृष्टी चोरुनियां माझारी । माजी गोवळांच्या नाचतो ॥२॥ येऊनियां कृष्णाजवळा । मुख पसरी इच्छूनि कवळा । तंव हा दावूनियां आणिका गोवळां । मुखीं भरी स्वानंदे ॥३॥ सर्वांग देखणा श्रीहरी । व्यापक सकळांचे अंतरी । ब्रम्हा पाडियला फेरी । नेदी शितंबोटी आतळों ॥४॥ म्हणे ठकूनियां घेऊ आला । कैसेचि अधिकारी तो झाला । नव्हे सोंगादिन मी दादुला । भंल कोणचा सांगाती ॥५॥ मग म्हणे वांकुल्या दावा यासी । न पवे भाग कृत्रिमवेषी । तुम्ही सेवारे सावकाशी । आजिचिया सुखासी पार नाहीं ॥६॥ ऐसे जेविले समस्त । ब्रम्हा राहिला टोकत । निळा म्हणे हा हदगत । जाणे सकळां अंतरीचें ॥७॥