भजनी मालिका
← भजनांकडे परत

याच्या संगसुखें गर्भवास घेतां । येत जात गे कल्पाच्या चळथा । नेघो भुक्ति मुक्ति देतां सायुज्यता । ऐशा गौळणी त्या सुखानंदभरिता वो

yachya sangasukhen garbhavas ghetan | yet jat ge kalpachya chalatha | negho bhukti mukti detan sayujyata | aisha gaulani tya sukhanandabharita vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
याच्या संगसुखें गर्भवास घेतां । येत जात गे कल्पाच्या चळथा । नेघो भुक्ति मुक्ति देतां सायुज्यता । ऐशा गौळणी त्या सुखानंदभरिता वो ॥१॥ धन्य प्रेमळा त्या रंगल्या श्रीरंगी । नेणती दुसरें वों संसारी विरागी । हरिचीं भूषणें त्या लेऊनि निजांगी । सुखी सुखरुप भोगी नित्य त्यागी वो ॥२॥ याच्या सहवासें वो भोगिता निजभोग । भोगीं भोगातीता सर्वदा नि:संग । नथेचि दृष्यावरी देखतीहि जग । ऐशा विचरती होऊनि अनंग वो ॥३॥ नित्य जनीं वनीं हरीतें देखती । हरीचि होऊनियां हरीतें भजती । हरिरुप झाली त्यांची अंगकांति । हरिचि मुसावला ध्यानीं मनीं चित्तीं वो ॥४॥ येती जाती त्या हरिच्या सांगा तें । वसती नित्यकाळ हरि वसे जेथें । करिती भोजने त्यां जेववितां हरीतें । हरीविण त्या न घेती जीवनातें वो ॥५॥ निळा म्हणे तया हरीच सांगाती । त्याहि वर्तताती हरीच्या अनुवृत्ती । नाहीं उरविली दोनीपणें खंती । वसती एकएकीं निजात्मता युक्ती वो ॥६॥