भजनी मालिका
← भजनांकडे परत

याचिलागीं वो त्यजियलें भोग । याचिलागीं वो केले नाना याग । याचिलागीं वो अष्टांगादी योग । याचिलागीं या विषयांचे त्याग वो

yachilagin vo tyajiyalen bhog | yachilagin vo kele nana yag | yachilagin vo ashtangadi yog | yachilagin ya vishayanche tyag vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
याचिलागीं वो त्यजियलें भोग । याचिलागीं वो केले नाना याग । याचिलागीं वो अष्टांगादी योग । याचिलागीं या विषयांचे त्याग वो ॥१॥ जन्माजन्मांतरी केली हे सूचना । याचिलागीं वो वसविलें निर्जना । भक्षूनि फळ मूळ प्राशिले जीवना याचिलागीं केलें तीर्थाटना वो ॥२॥ याचिलागीं वो आसनीं शयनीं । केली निरंतर याचि चिंतवणी । बैसलें धरुनियां रुप निज ध्यानी । नामी नेमियेली नित्य याचे वाणी वो ॥३॥ याचिलागीं वो मंत्रजप केला । याचिलागीं वो वेदांत पाहिला । याचिलागीं वो निजधर्म आनुष्ठिला । याचिलागीं म्यां संसार त्यजिला वो ॥४॥ याचिलागीं हे नित्यज्ञान । केलें सायास ते याचि वो लागून । याचिलागीं नियमीं निरोधिलें मन वों ॥५॥ याचिलागीं मी झालीये उदास । सांडूनि आपुलिया परिख्याची आस । याचिलागिं याचा निजध्यास । धरिला निळा म्हणे निशिदिनी ध्यास वो ॥६॥