भजनी मालिका
← भजनांकडे परत

याचिलागीं परांगना । मानिती हुताशनापरी ज्ञाते

yachilagin parangana | maniti hutashanapari dnyate

रचनाकार: संत निळोबा · अभंग
याचिलागीं परांगना । मानिती हुताशनापरी ज्ञाते ॥१॥ जवळी गेल्या जाळूं शके । म्हणोनि धाकें पळती त्या ॥२॥ आधीं तों न करिती संभाषण । मी एकांतदर्शन कैचें त्यां ॥३॥ निळा म्हणे शुचिर्भूत । वसती निर्धूत जनीं वनीं ॥४॥