भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यापक तें नाम अनंत ब्रह्माडीं । मना सोंस सांडीं कल्पनेचा

vyapak ten nam anant brahmadin | mana sons sandin kalpanecha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
व्यापक तें नाम अनंत ब्रह्माडीं । मना सोंस सांडीं कल्पनेचा ॥१॥ कल्पनाविरहित नाम तूंचि गाये । सर्व पाहे विठ्ठला पायीं ॥२॥ ठसावेल मूर्ति पाहतां अनुभव । पांचांचा मग ठाव कैंचा तेथें ॥३॥ एका जनार्दनीं संपुर्ण अवघा । भीमातीरीं थडवा उभा असे ॥४॥