भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्याही जांवयांच्या कोडी । पोषितसे अति आवडी

vyahi janvayanchya kodi | poshitase ati avadi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
व्याही जांवयांच्या कोडी । पोषितसे अति आवडी ॥१॥ देहसुखाचिया चाडा । अवघे मेळविले वोढा ॥२॥ देहीं वाढवी अतिप्रीती । पुत्र दारा माझे म्हणती ॥३॥ जैसा जोंधळा कणा चढे कणभारे क्षितीं पडें ॥४॥ वृक्षा फळे येती अपारें । फळभारें वृक्ष लवें ॥५॥ ऐसा भुलला स्वजनासी । एका जनार्दनीं सायासी ॥६॥