भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्याघ्रामुखीं सांपडतां गाय । तेथें धांवण्या कोण जाय

vyaghramukhin sampadatan gay | tethen dhanvanya kon jay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
व्याघ्रामुखीं सांपडतां गाय । तेथें धांवण्या कोण जाय ॥१॥ तैसा विषयभोग साचा । भोगितां सुखाचा सुख म्हणती ॥२॥ येतां यमदुतें बापुडीं । कोण सोडी अधमासीं ॥३॥ म्हणोनि मारितसे हाका । भुलुं नका संसारा ॥४॥ शरण एका जनार्दनीं । सोडवील धनी त्रैलोक्याचा ॥५॥