भजनी मालिका
← भजनांकडे परत

वृध्द ते म्हणती संसार करावा । जनाहातीं घ्यावा म्हणुनी बरें

vrudhda te mhanati sansar karava | janahatin ghyava mhanuni baren

रचनाकार: संत रामदास · अभंग
वृध्द ते म्हणती संसार करावा । जनाहातीं घ्यावा म्हणुनी बरें ।। म्हणताती जन बरें ते कोणाला । बुडविती त्याला ऐशा बोधी ।। वैश्वदेव दान अतिथी तो घडें । टाकी एकीकडे केले दोष ।। मूर्ख तो म्हणाला काय जी वाल्मिक । टाकितां सकळिक मुक्त जाला ।। रामदास म्हणे कथिलें। जे वेदीं । तया मात्र बंदी इतर थोर ।।