भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्रतामाजीं व्रत एकादशी पावन । दिंडी जागरण देवा प्रिय

vratamajin vrat ekadashi pavan | dindi jagaran deva priy

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
व्रतामाजीं व्रत एकादशी पावन । दिंडी जागरण देवा प्रिय ॥१॥ अष्टही प्रहर हरिकथा करी । वाचें विठ्ठल हरी वदोनियां ॥२॥ टाळ मृदंग वाजती गजरें । विठ्ठल प्रेमभरें नाचतसे ॥३॥ एका जनार्दनीं व्रताचा छंद । तेणें परमानंद सुख पावे ॥४॥