भजनी मालिका
← भजनांकडे परत

वोस घर वस्तीस काह्मा । तैसें देवा कोण पुसे

vos ghar vastis kahma | taisen deva kon puse

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वोस घर वस्तीस काह्मा । तैसें देवा कोण पुसे ॥१॥ सांडोनियां पंढरीराणा । वोस राना कोण धांवे ॥२॥ घेती मासांचें अवदान । देवपण कैंचे तेथें ॥३॥ ऐसिया देवासी पुजणें । एका जनार्दनीं खोटें जिणें ॥४॥