भजनी मालिका
← भजनांकडे परत

वोरसोनियां भक्तासाठीं । धांवे वैकुंठीहुनी उठाउठी । हात ठेऊनियां कटीं । उभा व्दारीं ठाकला

vorasoniyan bhaktasathin | dhanve vaikunthihuni uthauthi | hat theuniyan katin | ubha vdarin thakala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वोरसोनियां भक्तासाठीं । धांवे वैकुंठीहुनी उठाउठी । हात ठेऊनियां कटीं । उभा व्दारीं ठाकला ॥१॥ देखोनियां पुंडलिकासी । वास केला तयापाशीं । अवलोकूनियां निजभक्तांसी । परम विश्रांती पावला ॥२॥ जे जे येती दर्शनाशी । भुक्तिमुक्ति वांटी त्यांसी । गाती वानिती जे यासी । त्यां ने वैकुंठासी निज गजरें ॥३॥ नेघे त्यांची अतिशय सेवा । जिहीं आळविलें याचिया नांवा । धांवोनि त्यांचा करी कुडावा । आपुलिया गांवा ने त्यांसी । ॥४॥ न म्हणेचि दिवसरात्री काहीं । सदा भक्तांचिये वाहीं । निळा म्हणे त्यांच्याची देहीं । प्रगट नव्हे निराळा ॥५॥