भजनी मालिका
← भजनांकडे परत

वोखद घेतलिया पाठीं । तेणें तुटी होय रोगा

vokhad ghetaliya pathin | tenen tuti hoy roga

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वोखद घेतलिया पाठीं । तेणें तुटी होय रोगा ॥१॥ पथ्य साचार साचार । नामीं धरा निर्धार ॥२॥ वोखदासी कारण पथ्य । भवरोगीयां रामनामें मुक्त ॥३॥ एका जनार्दनीं करा । श्रीराम राम उच्चारा ॥४॥