भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटोळेंविण पोटा आला । अवघा संसार मिंधा केला

vitolenvin pota ala | avagha sansar mindha kela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विटोळेंविण पोटा आला । अवघा संसार मिंधा केला ॥१॥ लग्न लागतां आला पोटा । मग सोडिलें अंतरपाता ॥२॥ ॐकारेसी बुडाली घडी । लग्न लाविलें औटावे घडीं ॥३॥ एका जनार्दनीं लग्न समरसें । पाहों गेलिया त्या लाविलें पिसें ॥४॥