भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटिदांडु चेंडु भला रे । मनीं समजोनी मारा टोला रे

vitidandu chendu bhala re | manin samajoni mara tola re

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विटिदांडु चेंडु भला रे । मनीं समजोनी मारा टोला रे ॥१॥ खेळूं विटिदाडुं चेंडु । काळा नका भिऊ गांडु रे ॥धृ॥ सहा चारएकत्र करुनी अवघे पुढें रहा । सावध होऊनि धरा चेंडु कोणी कोणाकडे न पहा ॥२॥ प्रपंचाचे घाई धन वित्त म्हनता भाई । हातीचा चेंडु सोडुनी देई पुढें मारील डोई ॥३॥ खेळ खेळा परी मनीं धरा जनार्दन । तेणे चुके जन्ममरण शरण एका जनार्दन ॥४॥