भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटि दांडू भला रे तरीच मारीं टोला । नाहीं तरि डाव घेतां धांवडिती मुला

viti dandu bhala re tarich marin tola | nahin tari dav ghetan dhanvaditi mula

रचनाकार: संत निळोबा · अभंग
विटि दांडू भला रे तरीच मारीं टोला । नाहीं तरि डाव घेतां धांवडिती मुला ॥१॥ सावधान पाहे रे हरीचि चित्तीं ध्याये । न राहोनि निदसुरा खेळाच्या प्रवाहें ॥२॥ हाणें नीट दांडू रे नाहीं तरी नाडू । वाउगाचि टोला होतां पावसील दंडू ॥३॥ निळा म्हणे हरिमुखें म्हणतांचि सुनेति । न चुके जो त्वरा करी तोचि पावे कीर्ति ॥४॥