भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठुच्या छंदासी । पडतां आहे रे विवसी

vithuchya chhandasi | padatan ahe re vivasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विठुच्या छंदासी । पडतां आहे रे विवसी ॥१॥ संसाराची वाताहात । नामया होसी तूं निवांत ॥२॥ वडिलाची गोष्टी । नामा सांगे जगजेठी ॥३॥ एका जनार्दनीं वेधलें मन । ध्यानीं मनीं विठ्ठल पूर्ण ॥४॥