भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल सांवळा पंढरीये उभा । धन्य त्यांची शोभा सोभतसे

viththal sanvala pandhariye ubha | dhanya tyanchi shobha sobhatase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विठ्ठल सांवळा पंढरीये उभा । धन्य त्यांची शोभा सोभतसे ॥१॥ पुंडलिका मागें कर ठेवुनी कटीं । समपाय विटीं देखियेला ॥२॥ राहीं रखुमाई शोभती त्या बाहीं । बैष्णव दोही बाहीं गरुडपारीं ॥३॥ एका जनार्दनीं पाहुनियां । ध्यान मनाचें उन्मन होत असें ॥४॥