भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटेवरी उभा नीट कटावरी कर । वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये

vitevari ubha nit katavari kar | vat pahe nirantar bhaktachi ge maye

रचनाकार: संत सेना · अभंग
विटेवरी उभा नीट कटावरी कर । वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये ॥१॥ श्रीमुकुट रत्नाचा ढाळ देती कुंडलांचा । तुरा खोंविला मोत्याचा तो गे माय ॥२॥ कंठी शोभे एकावळी । तोडर गर्जे भूमंडळी। भक्तजनाची माउली तो गे माये ॥३॥ सोनसळा पीतांबर। ब्रीद वागवी मनोहर । सेना वंदि निरंतर तो गे माय ॥४॥